Skip to main content

गोल्डन गर्ल - पी. टी. उषा


इयत्ता सातवी मध्ये असताना एका मुलीने तिच्या शिक्षिकेच्या सांगण्यावरून तिच्याच वर्गातील धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविलेल्या मुली बरोबर शर्यत लावली आणि ती शर्यत त्या मुलीने जिंकली सुद्धा. पुढे जाऊन याच मुलीने भारताचे नाव धावण्याच्या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकावले. महिलांमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नाव चमकावणारी ही मुलगी म्हणजेच भारताची गोल्डन गर्ल पी. टी. उषा. भारताच्या क्रीडा इतिहासात आंतरराष्ट्रीय पातळीवर महिलांच्या स्पर्धेत नावलौकिक मिळवून देणाऱ्या महिला खेळाडूंची संख्या खूप कमी होती. पण पी. टी. उषा यांच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रीडाक्षेत्रातील भारतीय महिलांची कारकीर्द खऱ्या अर्थाने सुरू झाली

1964 मध्ये केरळ येथे पी. टी. उषा यांचा जन्म झाला. भारतीय समाजव्यवस्थेत त्यावेळी महिलांना दुय्यम स्थान होते. लहानपणापासूनच खेळाची आवड असलेल्या उषा यांनी धावणे या क्रीडा प्रकारात भाग घेत शालेय स्तरावर अनेक प्राविण्य मिळवले. 1977 मध्ये एका स्पर्धेच्या बक्षीस वितरण या त्यावेळचे अथलेटिक्सचे नामवंत प्रशिक्षक नांबियार आणि पी. टी. उषा यांची भेट झाली. पी. टी. उषा यांच्यातील गुण नांबियार यांनी हेरले आणि त्यांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. 400 मीटर धावणे हा त्यांचा मुख्य इव्हेंट. त्यानंतर वेगवेगळ्या वयोगटाच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये उषा यांनी चमकदार कामगिरी केली.

पुढे 1980 मॉस्को ऑलिंपिक स्पर्धेमध्ये त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. भारतातर्फे सर्वात कमी वयात ऑलम्पिक खेळणारी महिला खेळाडू म्हणून त्या या स्पर्धेत सहभागी झाल्या. या स्पर्धेत त्यांची कामगिरी चांगली झाली नाही. पण त्यानंतर 1984 लॉस एंजेलिस येथे झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेमध्ये 400 मीटर धावण्यात त्यांनी अंतिम फेरीत मजल मारली. भारतातर्फे धावण्याच्या स्पर्धेत मिल्खासिंग यांच्या नंतर अशी कामगिरी करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय होत्या. दुर्दैवाने अंतिम फेरीतील शर्यतीमध्ये त्यांचे कांस्यपदक थोडक्यात हुकले. पण सर्व भारतीयांना आणि विशेषता भारतीय महिलांना अभिमान वाटावी अशी कामगिरी त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर केली होती.

भारतीय महिलांची सामाजिक स्थिती बदलण्यासाठी ज्या चळवळी झाल्या त्यामध्ये पी. टी. उषा यांच्या रूपाने तयार झालेली क्रीडा चळवळ अत्यंत महत्त्वाची होती. 1991 पर्यंत त्यांनी भारताला आशियाई स्पर्धा, कॉमनवेल्थ स्पर्धा आणि वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये अनेक पदके मिळवून दिली. 1991 मध्ये त्यांनी खेळातून संन्यास घेतला. सामाजिक आणि कौटुंबिक बंधनात अडकलेल्या भारतीय महिलांसाठी त्यांनी एक नवीन आदर्श निर्माण केला. महिला क्रीडा चळवळीसाठी त्यांनी पोषक वातावरण तयार केले. सायना नेहवाल, पी. व्ही. सिंधू, मिताली राज, कर्णम मल्लेश्वरी, सानिया मिर्झा यांनी पी. टी. उषा यांचा वारसा यशस्वीपणे पुढे चालवला. कोणत्याही बाबतीत यश मिळवण्यासाठी प्रेरणा देणे महत्वाचे असते. भारतीय महिलांना क्रीडा क्षेत्राकडे वळण्यासाठी प्रेरणा देण्याचे काम पी. टी. उषा यांनी केले. म्हणूनच भारतीय महिला क्रीडा चळवळीच्या जनक म्हणून पी. टी. उषा यांना संबोधले तर वावगे ते ठरणार नाही.

प्रा. श्रीनिवास पाटील
डी. आर. माने महाविद्यालय, कागल
9422415818
shrisports6@gmail.com

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

फ्लाइंग सिख - मिल्खा सिंग

जगाच्या क्रीडा व्यासपिठावर भारताची दखल घेण्यास भाग पाडणारे ॲथलिट म्हणून मिल्खा सिंग यांचे नाव घ्यावे लागेल. ज्यावेळी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची कामगिरी फारशी चांगली नव्हती, त्यावेळी वेगवान धावपटू मिल्खासिंग यांच्या अप्रतिम कामगिरीमुळे साऱ्या जगाची भारतीय क्रीडाक्षेत्राकडे बघण्याची दृष्टी बदलली. संपूर्ण क्रीडाक्षेत्रात एक सच्चा देशभक्त खेळाडू म्हणून त्यांची ओळख आहे. 'भाग मिल्खा भाग' हा त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपट आपणास आपणा सर्वांना माहीत आहेच. 1947 देशाच्या फाळणी वेळी झालेल्या दंगलीमध्ये त्यांच्या सर्व कुटुंबीयांची डोळ्यादेखत झालेली हत्या ही भयानक आठवणी घेऊन ते स्वतःचा जीव वाचवत दिल्लीतील निर्वासितांच्या छावणीत दाखल झाले. एक ग्लास दुधासाठी ते सेनादलातर्फे आयोजित धावण्याच्या स्पर्धेत सहभागी झाले आणि भारताला धावपटूच्या स्वरूपात एक हिरा मिळाला. प्रतिकूल परिस्थितीमध्ये कोणत्याही आर्थिक मदतीशिवाय आणि मार्गदर्शनाशिवाय त्यांनी 200 मी. आणि 400 मी. धावण्यामध्ये अत्यंत कमी कालावधीत प्राविण्य मिळविले. 1954 ते 1964 दरम्यान आशियाई स्पर्धा, राष्ट्रकुल स्पर्धा, जागतिक अज...

भारतीय क्रिकेटचा बादशाह - कपिल देव

मेजर ध्यानचंद, खाशाबा जाधव यांच्या नंतर 1950 ते 1990 पर्यंत अनेक नामवंत खेळाडू होऊन गेले. यामध्ये फुटबॉलचे सय्यद अब्दुल रहीम, ऍथलेटिक्सचे फ्लाइंग सिख मिल्खा सिंग, गोल्डन गर्ल पी.टी. उषा, टेनिसचे रामनाथन कृष्णन, जलतरणातील मिहिर सेन, हॉकीमधील असलम शेरखान, अजित पाल, बॅडमिंटनचे प्रकाश पदुकोण, क्रिकेटमधील टायगर पतौडी, फारूक इंजिनियर, सुनील गावस्कर यांची नावे घेता येतील. पण खऱ्या अर्थाने ज्यांनी भारतीय क्रीडा क्षेत्राचा चेहरा-मोहरा बदलला ते म्हणजे भारताच्या पहिल्या विश्वचषक क्रिकेट विजेत्या संघाचे कर्णधार कपिल देव. अवघ्या 24 वर्षाचे असताना त्यांनी भारतीय संघाला त्यांच्या नेतृत्वाखाली विश्वचषक जिंकून दिला आणि भारतीय क्रिकेटला एक नवी दिशा मिळाली.  वेस्टइंडीज सारख्या बलाढ्य संघाला 1983 साली अंतिम सामन्यात पराभूत करून भारतीय संघाने विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले. पण या विश्वचषक स्पर्धेअगोदर भारतीय संघाने वेस्टइंडीजचा दौरा केला होता. या दौऱ्यामध्ये भारतीय संघाने अतिशय चांगली कामगिरी करून वेस्टइंडीज सारख्या बलाढ्य संघाला आपण टक्कर देऊ शकतो हा आत्मविश्वास प्राप्त केला ...

लिओनल मेस्सी

  फुटबॉलमधील प्रतिष्ठेचा समजला जाणारा बॅल न डी ’ ऑर पुरस्कार पाचवेळा जिंकत ज्याने तमाम फुटबॉल रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले तो महान खेळाडू म्हणजे लिओनल मेस्सी . 2005 पासून व्यावसायिक फुटबॉलमध्ये स्वतःची कारकीर्द सुरू करणाऱ्या या खेळाडूने गेल्या सतरा वर्षात फुटबॉलमध्ये सर्व काही कमावले . फक्त कमी होती ती विश्वचषकाची . रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात बलाढ्य फ्रान्सला पराभूत करत मेस्सी ने विश्वचषक उंचावत ही कमतरता सुद्धा पूर्ण केली . फुटबॉल प्रेमींसाठी मेस्सी नेहमीच सर्वोत्तम होता . पण विश्वचषक उंचावल्यानंतर तो महानतेच्या सर्वोत्तम उंचीवर गेला . विश्वचषक उंचावण्याचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याने अंतिम सामन्यात 120 मिनिट मेहनत घेतली असली तरी त्याचे हे स्वप्न पूर्ण होण्यासाठी तो गेली सतरा वर्षे मेहनत घेत होता असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही . एका सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या मेस्सी ची फुटबॉल कारकीर्द वयाच्या आठव्या वर्षी सुरु झाली . त्याचे वडील एका स्थानिक क्लबला कोचिंग करायचे . घरातच फुटबॉलचे बाळकडू मिळाल्यामुळे त्याला फुटबॉलची आवड लागली . तो स्थानिक क्...