Skip to main content

हॉकी


हॉकी भारताचा राष्ट्रीय खेळ आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर या खेळाने भारताला क्रीडाक्षेत्रामध्ये एक वेगळी ओळख दिली. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतर काही दशके हॉकीमध्ये भारताचा दबदबा कायम होता. 1970 नंतर हॉकीमध्ये मोठे बदल झाले. हॉकी नैसर्गिक गवतावरून कृत्रिम गवतावर म्हणजेच एस्ट्रो टर्फवर खेळली जाऊ लागली. त्यामुळे कौशल्याबरोबरच शारीरिक क्षमता आणि वेगाला महत्त्व प्राप्त झाले. खेळाचे अनेक नियम बदलले गेले. युरोपियन देश शारीरिक क्षमतेच्या बाबतीत वरचढ असल्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांची पकड मजबूत होत गेली आणि आशियाई देश मागे पडले.


भारताने आजपर्यंत ऑलिंपिक स्पर्धेत हॉकीमध्ये आठ वेळा सुवर्णपदक, एकदा रौप्यपदक तर तीन वेळा कांस्यपदकाची कमाई केली आहे. 1928 ते 1964 हा भारतीय हॉकीसाठी सुवर्णकाळ होता. 1960 ची रोम ऑलिंपिक स्पर्धा वगळता या कालावधीत प्रत्येक स्पर्धेत भारताने सुवर्णपदक कमावले. 1980 च्या मॉस्को ऑलिंपिक स्पर्धेत आठवे आणि शेवटचे सुवर्णपदक भारताला मिळाले. या आठ सुवर्णपदकं मधील सर्वात महत्त्वाचे सुवर्णपदक 1948 च्या लंडन ऑलिंपिक मधील होते. अंतिम सामन्यात भारताने ब्रिटिशांचा त्यांच्याच मातीत 4-0 ने पराभव केला. स्वातंत्र्यानंतर वर्षभरातच ब्रिटिशांचा त्यांच्याच मायभूमीत पराभुत करण्याचा पराक्रम भारतीय हॉकी संघाने केला होता.


हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद हे भारतीय क्रीडा क्षेत्रातील एक महान व्यक्तिमत्व. त्यांचे बॉलवरील नियंत्रण आणि गोल करण्याची क्षमता अफलातून होती. 1928, 1932 आणि 1936 या तीन ऑलिंपिक स्पर्धेमध्ये मे.ध्यानचंद यांच्या जादुई खेळामुळे भारतीय संघाने प्रतिस्पर्धी संघांचा एकतर्फी पराभव करून सुवर्णपदक कमावले. 1936 च्या बर्लिन ऑलिंपिक स्पर्धेत भारताने यजमान जर्मनीचा त्यांच्याच मायभूमीत 8 -1 असा पराभव केला. जर्मनीचा हुकूमशहा ॲडॉल्फ हिटलर यांनी मेजर ध्यानचंद यांच्या खेळावर प्रभावित होऊन त्यांना जर्मनीचे नागरिकत्व आणि कर्नल पदावर नियुक्तीची ऑफर दिली. अट होती की मे. ध्यानचंद यांनी तिथून पुढे जर्मनीसाठी खेळायचे. मे. ध्यानचंद यांनी नम्रपणे उत्तर दिले की मी भारतीय आहे आणि मी अजन्म भारतासाठीच खेळत राहीन. 29 ऑगस्ट
हा मे. ध्यानचंद यांचा जन्मदिन. हा दिवस दरवर्षी राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो.

प्रा. श्रीनिवास पाटील
डी. आर. माने महाविद्यालय, कागल
9422415818
shrisports6@gmail.com

Comments

Popular posts from this blog

फ्लाइंग सिख - मिल्खा सिंग

जगाच्या क्रीडा व्यासपिठावर भारताची दखल घेण्यास भाग पाडणारे ॲथलिट म्हणून मिल्खा सिंग यांचे नाव घ्यावे लागेल. ज्यावेळी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची कामगिरी फारशी चांगली नव्हती, त्यावेळी वेगवान धावपटू मिल्खासिंग यांच्या अप्रतिम कामगिरीमुळे साऱ्या जगाची भारतीय क्रीडाक्षेत्राकडे बघण्याची दृष्टी बदलली. संपूर्ण क्रीडाक्षेत्रात एक सच्चा देशभक्त खेळाडू म्हणून त्यांची ओळख आहे. 'भाग मिल्खा भाग' हा त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपट आपणास आपणा सर्वांना माहीत आहेच. 1947 देशाच्या फाळणी वेळी झालेल्या दंगलीमध्ये त्यांच्या सर्व कुटुंबीयांची डोळ्यादेखत झालेली हत्या ही भयानक आठवणी घेऊन ते स्वतःचा जीव वाचवत दिल्लीतील निर्वासितांच्या छावणीत दाखल झाले. एक ग्लास दुधासाठी ते सेनादलातर्फे आयोजित धावण्याच्या स्पर्धेत सहभागी झाले आणि भारताला धावपटूच्या स्वरूपात एक हिरा मिळाला. प्रतिकूल परिस्थितीमध्ये कोणत्याही आर्थिक मदतीशिवाय आणि मार्गदर्शनाशिवाय त्यांनी 200 मी. आणि 400 मी. धावण्यामध्ये अत्यंत कमी कालावधीत प्राविण्य मिळविले. 1954 ते 1964 दरम्यान आशियाई स्पर्धा, राष्ट्रकुल स्पर्धा, जागतिक अज...

भारतीय क्रिकेटचा बादशाह - कपिल देव

मेजर ध्यानचंद, खाशाबा जाधव यांच्या नंतर 1950 ते 1990 पर्यंत अनेक नामवंत खेळाडू होऊन गेले. यामध्ये फुटबॉलचे सय्यद अब्दुल रहीम, ऍथलेटिक्सचे फ्लाइंग सिख मिल्खा सिंग, गोल्डन गर्ल पी.टी. उषा, टेनिसचे रामनाथन कृष्णन, जलतरणातील मिहिर सेन, हॉकीमधील असलम शेरखान, अजित पाल, बॅडमिंटनचे प्रकाश पदुकोण, क्रिकेटमधील टायगर पतौडी, फारूक इंजिनियर, सुनील गावस्कर यांची नावे घेता येतील. पण खऱ्या अर्थाने ज्यांनी भारतीय क्रीडा क्षेत्राचा चेहरा-मोहरा बदलला ते म्हणजे भारताच्या पहिल्या विश्वचषक क्रिकेट विजेत्या संघाचे कर्णधार कपिल देव. अवघ्या 24 वर्षाचे असताना त्यांनी भारतीय संघाला त्यांच्या नेतृत्वाखाली विश्वचषक जिंकून दिला आणि भारतीय क्रिकेटला एक नवी दिशा मिळाली.  वेस्टइंडीज सारख्या बलाढ्य संघाला 1983 साली अंतिम सामन्यात पराभूत करून भारतीय संघाने विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले. पण या विश्वचषक स्पर्धेअगोदर भारतीय संघाने वेस्टइंडीजचा दौरा केला होता. या दौऱ्यामध्ये भारतीय संघाने अतिशय चांगली कामगिरी करून वेस्टइंडीज सारख्या बलाढ्य संघाला आपण टक्कर देऊ शकतो हा आत्मविश्वास प्राप्त केला ...

लिओनल मेस्सी

  फुटबॉलमधील प्रतिष्ठेचा समजला जाणारा बॅल न डी ’ ऑर पुरस्कार पाचवेळा जिंकत ज्याने तमाम फुटबॉल रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले तो महान खेळाडू म्हणजे लिओनल मेस्सी . 2005 पासून व्यावसायिक फुटबॉलमध्ये स्वतःची कारकीर्द सुरू करणाऱ्या या खेळाडूने गेल्या सतरा वर्षात फुटबॉलमध्ये सर्व काही कमावले . फक्त कमी होती ती विश्वचषकाची . रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात बलाढ्य फ्रान्सला पराभूत करत मेस्सी ने विश्वचषक उंचावत ही कमतरता सुद्धा पूर्ण केली . फुटबॉल प्रेमींसाठी मेस्सी नेहमीच सर्वोत्तम होता . पण विश्वचषक उंचावल्यानंतर तो महानतेच्या सर्वोत्तम उंचीवर गेला . विश्वचषक उंचावण्याचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याने अंतिम सामन्यात 120 मिनिट मेहनत घेतली असली तरी त्याचे हे स्वप्न पूर्ण होण्यासाठी तो गेली सतरा वर्षे मेहनत घेत होता असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही . एका सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या मेस्सी ची फुटबॉल कारकीर्द वयाच्या आठव्या वर्षी सुरु झाली . त्याचे वडील एका स्थानिक क्लबला कोचिंग करायचे . घरातच फुटबॉलचे बाळकडू मिळाल्यामुळे त्याला फुटबॉलची आवड लागली . तो स्थानिक क्...