एम. सी. मेरी कोम पी. टी. उषा यांच्यानंतर त्यांनी सुरू केलेली महिलांची क्रीडा चळवळ सध्या अनेक महिला खेळाडू यशस्वीपणे पुढे नेत आहेत. यातीलच एक अतिशय महत्त्वकांक्षी महिला खेळाडू ज्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागला, पण या सर्व संकटांवर यशस्वीपणे मात करत त्यांनी स्वतःला सिद्ध केले. त्या म्हणजे बॉक्सर एम. सी. मेरी कोम. मणिपूर येथे गरीब कुटुंबात जन्मलेल्या मेरी कोम यांनी बॉक्सिंगसारख्या धाडसी आणि ताकतीच्या खेळांमध्ये स्वतःचे करिअर करायचे ठरवले आणि प्रचंड मेहनत घेतली. आज भारतातच नाही तर आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग रिंगमध्ये त्यांचे नाव आदराने घेतले जाते. भारतामध्ये बॉक्सिंग हा खेळ जास्त प्रसिद्ध नाही. मुळातच बॉक्सिंग म्हणजे ताकतीचा खेळ. महिलांचे प्रमाण अतिशय कमीच. अशा आव्हानात्मक परिस्थितीत मेरी यांनी बॉक्सिंग मध्ये प्रवेश केला. त्यावेळी 1998 एशियन गेम्समध्ये डिंकोसिंग या मणिपूरच्या भारतीय बॉक्सरने सुवर्णपदक मिळवले होते. डिंकोसिंग यांच्यापासून प्रेरणा घेत मेरी कोम यांनी डिंकोसिंग यांच्याकडे प्रशिक्षण सुरू केले. त्यांच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती इतकी चांगली नव्हती त्यामुळे बॉक्सिंगच...