एम. सी. मेरी कोम
पी. टी. उषा यांच्यानंतर त्यांनी सुरू केलेली महिलांची क्रीडा चळवळ सध्या अनेक महिला खेळाडू यशस्वीपणे पुढे नेत आहेत. यातीलच एक अतिशय महत्त्वकांक्षी महिला खेळाडू ज्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागला, पण या सर्व संकटांवर यशस्वीपणे मात करत त्यांनी स्वतःला सिद्ध केले. त्या म्हणजे बॉक्सर एम. सी. मेरी कोम. मणिपूर येथे गरीब कुटुंबात जन्मलेल्या मेरी कोम यांनी बॉक्सिंगसारख्या धाडसी आणि ताकतीच्या खेळांमध्ये स्वतःचे करिअर करायचे ठरवले आणि प्रचंड मेहनत घेतली. आज भारतातच नाही तर आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग रिंगमध्ये त्यांचे नाव आदराने घेतले जाते.
भारतामध्ये बॉक्सिंग हा खेळ जास्त प्रसिद्ध नाही. मुळातच बॉक्सिंग म्हणजे ताकतीचा खेळ. महिलांचे प्रमाण अतिशय कमीच. अशा आव्हानात्मक परिस्थितीत मेरी यांनी बॉक्सिंग मध्ये प्रवेश केला. त्यावेळी 1998 एशियन गेम्समध्ये डिंकोसिंग या मणिपूरच्या भारतीय बॉक्सरने सुवर्णपदक मिळवले होते. डिंकोसिंग यांच्यापासून प्रेरणा घेत मेरी कोम यांनी डिंकोसिंग यांच्याकडे प्रशिक्षण सुरू केले. त्यांच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती इतकी चांगली नव्हती त्यामुळे बॉक्सिंगचे प्रोफेशनल ट्रेनिंग घेणे त्यांना तितके सोपे नव्हते. तरीसुद्धा 1999 साली त्यांनी आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली. सुरुवातीला आलेल्या अनेक लहान मोठ्या अडचणींवर मात करत मेरी कोम यांनी निश्चयाने आपली वाटचाल सुरू ठेवली. पुढे तीनच वर्षात तुर्की येथे झालेल्या महिला विश्व बॉक्सिंग चंपियनशिपमध्ये 45 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावत स्वतःला सिद्ध केले.
सात जागतिक बॉक्सिंग चंपियनशिपमध्ये भाग घेऊन सातही चॅम्पियनशिपमध्ये पदक जिंकणाऱ्या मेरी कोम एकमेव बॉक्सर आहेत. आशियाई स्पर्धा आणि विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये त्यांनी भारताला पदके मिळवून दिली. 2005 मध्ये त्यांचे लग्न झाले. 2007 मध्ये त्यांनी जुळ्या मुलांना जन्म दिला. त्यामुळे त्यांना काही काळ रिंग पासून लांब राहावे लागले. पण पुन्हा एकदा जोमाने पुनरागमन करत वर्षातच 2008 मध्ये चीन येथे झालेल्या महिला जागतिक बॉक्सिंग अजिक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. त्यानंतर त्यांना 'मदर मेरी' असे संबोधण्यात येऊ लागले. 2012 लंडन ऑलिम्पिकमध्ये भारताला फ्लाईवेट वजनी गटात कांस्यपदक मिळवून दिले.
त्यांच्या संपूर्ण क्रीडा कारकिर्दीमध्ये वडिलांकडून आणि कुटुंबीयांकडून त्यांना अजिबात प्रोत्साहन आणि पाठिंबा मिळाला नाही. पण त्यांचे पती के. ऑन्लर कोम त्यांच्या संपूर्ण कारकीर्दीत त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहिले. 2013 साली त्यांनी तिसऱ्या अपत्याला जन्म दिला आणि सर्वांना वाटले की आता मदर मेरी यांची क्रीडा कारकीर्द थांबेल. पण थांबतील त्या मेरी कोम कसल्या. त्यांनी पुन्हा जोमाने सुरुवात केली आणि पुन्हा भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध स्पर्धांमध्ये पदके मिळवून दिली.
मेरी कोम यांनी त्यांच्यातील प्रतिभेच्या आणि प्रयत्नांच्या जोरावर स्वतःबरोबरच भारताचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवले. खेळातील विविध पुरस्कारांनी सन्मानित मेरी यांना देशातील तिसरा सर्वात मोठा समजला जाणारा पद्मविभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. त्यांच्या प्रेरणात्मक जीवनावर आधारित त्यांची आत्मकथा 'अनब्रेकेबल' या पुस्तकाच्या माध्यमातून प्रकाशित करण्यात आलेली आहे. तसेच 2014 साली 'मेरी कॉम' नावाचा चित्रपट सुद्धा प्रदर्शित झालेला आहे. बॉक्सिंग केवळ पुरुषांची साम्राज्य आहे असा असलेले गैरसमज दूर करत मेरी यांनी महिला कुठल्याही क्षेत्रात मागे नाहीत हे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.
प्रा. श्रीनिवास पाटील
डी. आर. माने महाविद्यालय, कागल

Comments
Post a Comment