फिटनेस इंडस्ट्री ज्यावेळी आपण भारतातील फिटनेस इंडस्ट्रीच्या उत्क्रांतिचा विचार करते त्यावेळी नक्किच असे दिसते की फिटनेसशी संबंधित साहित्य-साधने तसेच सेवा-सुविधा या बाबतीत सध्या प्रचंड घडामोडी व बदल अतिशय जलद गतीने होत आहेत. फिटनेस सेक्टर अशा वळणावर आले आहे जिथून या क्षेत्राचा सकारात्मक विकास अतिशय जलद गतीने होणार आहे. लहान मुलापासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनाच जिम आणि फ़िटनेसने भुरळ घातली आहे. प्रगत तंत्रज्ञान आणि मोबाईलेच्या माध्यमातून महितीची सहजगतीने होणारी देवाण-घेवाण यासाठी खऱ्या अर्थाने कारणीभूत ठरते. सध्याच्या धावपळीच्या युगात फिट असावे असे सर्वांनाच वाटते आणि यासाठी फिटनेसच्या बाबतीतील सर्वच घटक सहजासहजी उपलब्ध होत असतील तर या क्षेत्राची आवड व कुतूहल तर वाढणारच. कमी वेळेत नावीन्यपूर्ण आणि रोमांचक अनुभवातुन शरीरसंपदा मिळवता येत असेल तर अशा पर्याय कोणीही आवडीने निवडतील. यातच एरोबिक्स, झुंबासारख्या नवनवीन व्यायाम ...