Skip to main content

Posts

लिओनल मेस्सी

  फुटबॉलमधील प्रतिष्ठेचा समजला जाणारा बॅल न डी ’ ऑर पुरस्कार पाचवेळा जिंकत ज्याने तमाम फुटबॉल रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले तो महान खेळाडू म्हणजे लिओनल मेस्सी . 2005 पासून व्यावसायिक फुटबॉलमध्ये स्वतःची कारकीर्द सुरू करणाऱ्या या खेळाडूने गेल्या सतरा वर्षात फुटबॉलमध्ये सर्व काही कमावले . फक्त कमी होती ती विश्वचषकाची . रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात बलाढ्य फ्रान्सला पराभूत करत मेस्सी ने विश्वचषक उंचावत ही कमतरता सुद्धा पूर्ण केली . फुटबॉल प्रेमींसाठी मेस्सी नेहमीच सर्वोत्तम होता . पण विश्वचषक उंचावल्यानंतर तो महानतेच्या सर्वोत्तम उंचीवर गेला . विश्वचषक उंचावण्याचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याने अंतिम सामन्यात 120 मिनिट मेहनत घेतली असली तरी त्याचे हे स्वप्न पूर्ण होण्यासाठी तो गेली सतरा वर्षे मेहनत घेत होता असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही . एका सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या मेस्सी ची फुटबॉल कारकीर्द वयाच्या आठव्या वर्षी सुरु झाली . त्याचे वडील एका स्थानिक क्लबला कोचिंग करायचे . घरातच फुटबॉलचे बाळकडू मिळाल्यामुळे त्याला फुटबॉलची आवड लागली . तो स्थानिक क्...
Recent posts

एम. सी. मेरी कोम

एम. सी. मेरी कोम पी. टी. उषा यांच्यानंतर त्यांनी सुरू केलेली महिलांची क्रीडा चळवळ सध्या अनेक महिला खेळाडू यशस्वीपणे पुढे नेत आहेत. यातीलच एक अतिशय महत्त्वकांक्षी महिला खेळाडू ज्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागला, पण या सर्व संकटांवर यशस्वीपणे मात करत त्यांनी स्वतःला सिद्ध केले. त्या म्हणजे बॉक्सर एम. सी. मेरी कोम. मणिपूर येथे गरीब कुटुंबात जन्मलेल्या मेरी कोम यांनी बॉक्सिंगसारख्या धाडसी आणि ताकतीच्या खेळांमध्ये स्वतःचे करिअर करायचे ठरवले आणि प्रचंड मेहनत घेतली. आज भारतातच नाही तर आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग रिंगमध्ये त्यांचे नाव आदराने घेतले जाते. भारतामध्ये बॉक्सिंग हा खेळ जास्त प्रसिद्ध नाही. मुळातच बॉक्सिंग म्हणजे ताकतीचा खेळ. महिलांचे प्रमाण अतिशय कमीच. अशा आव्हानात्मक परिस्थितीत मेरी यांनी बॉक्सिंग मध्ये प्रवेश केला. त्यावेळी 1998 एशियन गेम्समध्ये डिंकोसिंग या मणिपूरच्या भारतीय बॉक्सरने सुवर्णपदक मिळवले होते. डिंकोसिंग यांच्यापासून प्रेरणा घेत मेरी कोम यांनी डिंकोसिंग यांच्याकडे प्रशिक्षण सुरू केले. त्यांच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती इतकी चांगली नव्हती त्यामुळे बॉक्सिंगच...

गोल्डन गर्ल - पी. टी. उषा

इयत्ता सातवी मध्ये असताना एका मुलीने तिच्या शिक्षिकेच्या सांगण्यावरून तिच्याच वर्गातील धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविलेल्या मुली बरोबर शर्यत लावली आणि ती शर्यत त्या मुलीने जिंकली सुद्धा. पुढे जाऊन याच मुलीने भारताचे नाव धावण्याच्या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकावले. महिलांमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नाव चमकावणारी ही मुलगी म्हणजेच भारताची गोल्डन गर्ल पी. टी. उषा. भारताच्या क्रीडा इतिहासात आंतरराष्ट्रीय पातळीवर महिलांच्या स्पर्धेत नावलौकिक मिळवून देणाऱ्या महिला खेळाडूंची संख्या खूप कमी होती. पण पी. टी. उषा यांच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रीडाक्षेत्रातील भारतीय महिलांची कारकीर्द खऱ्या अर्थाने सुरू झाली 1964 मध्ये केरळ येथे पी. टी. उषा यांचा जन्म झाला. भारतीय समाजव्यवस्थेत त्यावेळी महिलांना दुय्यम स्थान होते. लहानपणापासूनच खेळाची आवड असलेल्या उषा यांनी धावणे या क्रीडा प्रकारात भाग घेत शालेय स्तरावर अनेक प्राविण्य मिळवले. 1977 मध्ये एका स्पर्धेच्या बक्षीस वितरण या त्यावेळचे अथलेटिक्सचे नामवंत प्रशिक्षक नांबियार आणि पी. टी. उषा यांची भेट झाली. ...

आधुनिक ऑलिंपिक स्पर्धा

आधुनिक ऑलिंपिक स्पर्धेची सुरुवात 1896 साली झाली. अथेन्समधील पॅनाथेनाइको स्टेडियममध्ये आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेच्या नेतृत्वाखाली पहिल्या ऑलिंपिक स्पर्धेच्या खेळांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेमध्ये 14 देशातील 241 खेळाडू सहभागी झाले आणि त्यांनी 43 क्रीडा प्रकारांसाठी एकमेकांबरोबर स्पर्धा केली. फ्रेंच शिक्षक बॅरोन पियर दि कुबर्टिन यांना आधुनिक ओलंपिकचे जनक असे संबोधले जाते. त्यांच्या प्रयत्नातून आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेची बांधणी झाली आणि आधुनिक ऑलम्पिक स्पर्धेची सुरुवात होण्यास मदत झाली. दर चार वर्षांनी या स्पर्धेचे आयोजन केले जाते. पहिल्या महायुद्धाच्या कारणामुळे 1916 साली आणि दुसऱ्या महायुद्धाच्या कारणामुळे 1940 आणि 1944 साली या स्पर्धा झाल्या नाहीत. पण त्यानंतर या स्पर्धेमध्ये कधीही खंड पडलेला नाही. Citius-Altius-Fortius म्हणजेच अधिक वेगवान, अधिक उंच आणि अधिक बलवान हे ऑलिंपिकचे बोधवाक्य आहे. जगातील सर्व देशातील खेळाडूंनी एकत्र येऊन स्पर्धेच्या माध्यमातून जागतिक एकात्मता व बंधुता वाढवावी, व्यक्तिमत्व आणि शारीरिक सक्षमता विकसित करावी, देशभक्तीची भावना वाढावी आणि...

हॉकी

हॉकी भारताचा राष्ट्रीय खेळ आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर या खेळाने भारताला क्रीडाक्षेत्रामध्ये एक वेगळी ओळख दिली. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतर काही दशके हॉकीमध्ये भारताचा दबदबा कायम होता. 1970 नंतर हॉकीमध्ये मोठे बदल झाले. हॉकी नैसर्गिक गवतावरून कृत्रिम गवतावर म्हणजेच एस्ट्रो टर्फवर खेळली जाऊ लागली. त्यामुळे कौशल्याबरोबरच शारीरिक क्षमता आणि वेगाला महत्त्व प्राप्त झाले. खेळाचे अनेक नियम बदलले गेले. युरोपियन देश शारीरिक क्षमतेच्या बाबतीत वरचढ असल्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांची पकड मजबूत होत गेली आणि आशियाई देश मागे पडले. भारताने आजपर्यंत ऑलिंपिक स्पर्धेत हॉकीमध्ये आठ वेळा सुवर्णपदक, एकदा रौप्यपदक तर तीन वेळा कांस्यपदकाची कमाई केली आहे. 1928 ते 1964 हा भारतीय हॉकीसाठी सुवर्णकाळ होता. 1960 ची रोम ऑलिंपिक स्पर्धा वगळता या कालावधीत प्रत्येक स्पर्धेत भारताने सुवर्णपदक कमावले. 1980 च्या मॉस्को ऑलिंपिक स्पर्धेत आठवे आणि शेवटचे सुवर्णपदक भारताला मिळाले. या आठ सुवर्णपदकं मधील सर्वात महत्त्वाचे सुवर्णपदक 1948 च्या लंडन ऑलिंपिक मधील होते. अंतिम सामन्यात भारताने ब्रिटिशांचा ...

ऑलम्पिक वीर खाशाबा जाधव

ऑलिंपिक स्पर्धेत भारताला हॉकी या सांघिक क्रीडा प्रकारामध्ये स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळामध्ये पदके मिळालेली आहेत. नुकत्याच झालेल्या टोकियो ऑलिंपिक स्पर्धेमध्ये भारतीय हॉकी संघाने बलाढ्य जर्मनीला नमवत कांस्यपदकाची कमाई केली. 1980 नंतर चाळीस वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर भारतीय संघाला हे पदक मिळालेले आहे. सांघिक खेळात जरी भारताला पदके मिळत असली तरी वैयक्तिक क्रीडा प्रकारांमध्ये भारताला अतिशय कमी पदके मिळाली आहेत. पदकांचा हा दुष्काळ स्वातंत्र्यपूर्व काळापासून सुरू होता. गेल्या काही ऑलम्पिक स्पर्धांचा अपवाद वगळता वैयक्तिक क्रीडा प्रकारांमध्ये आपल्या देशाची कामगिरी अत्यंत निराशाजनक झालेली आहे.  स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये सन 1900 च्या पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेमध्ये भारताला नॉर्मन प्रिचर्ड यांनी 200 मीटर धावणे या वैयक्तिक क्रीडा प्रकारामध्ये रौप्यपदक मिळवून दिले. पण नॉर्मन प्रिचर्ड हे भारतीय नागरिक नव्हते. ब्रिटिश इंडियन ॲथलिट म्हणून ते या स्पर्धेत सहभागी झाले होते. त्यामुळे भारताला जरी या स्पर्धेत पदक मिळाले असले तरी ते परदेशी नागरिकाकडून मिळालेले पदक होते. 1952...

भारतीय क्रीडा चळवळ

1952 हेलसिंकी येथे झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेमध्ये भारताला खाशाबा जाधव यांच्या रूपाने कुस्ती या वैयक्तिक क्रीडा प्रकारामध्ये पहिले पदक मिळाले. यानंतर जवळजवळ चार दशके म्हणजेच 1996 च्या अटलांटा ऑलिंपिक स्पर्धेपर्यंत भारताला कोणत्याही वैयक्तिक क्रीडा प्रकारामध्ये पदक मिळाले नाही. अनेक युरोपियन, लॅटिन अमेरिकन देश या काळात क्रीडा क्षेत्रात प्रगतीपथावर गेले. पण भारताचा हॉकी वगळता इतर खेळात असलेला पदकांचा दुष्काळ कायम राहिला. स्वातंत्र्यानंतर जवळजवळ एकविसाव्या शतकाच्या उदयापर्यंत भारतीय क्रीडाक्षेत्रात उदासीनताच दिसून आली. स्वातंत्र्यानंतर पुढच्या पन्नास वर्षांमध्ये काही महत्त्वाच्या कारणांमुळे भारतीय क्रीडा क्षेत्राची म्हणावी तशी प्रगती झाली नाही. स्वातंत्र्यानंतर सुरुवातीच्या काळात विविध संस्थाने खालसा करण्यासाठी झालेला संघर्ष, 1962 चीन युद्ध, 1965 पाकिस्तान युद्ध, 1971 बांगलादेश मुक्तीयुद्ध यामुळे या दशकांमध्ये क्रीडा क्षेत्राची पीछेहाट झाली. देशावर पडत असलेल्या अतिरिक्त आर्थिक भार यामुळे क्रीडा क्षेत्रासाठी भरीव आर्थिक तरतूद करता आली नाही. 1983 साली भारताने विश्वचषक क्रिकेट स्प...